English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - महिलांसाठी - विशेष केंद्रीय सहाय्य योजना

विशेष केंद्रीय सहाय्य योजना

योजनेचे स्वरूप

सदर योजना ही केंद्रिय सहाय्य योजना असून या अंतर्गत आराखडयात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणेकरीता नविनतम व कार्योपयोगी योजनेचा यामध्ये समावेश केला जातो. या योजनेअंतर्गत दरवर्षी नवीन योजना घेण्यात येतात. खालील योजना यापूर्वीच्या वर्षामध्ये मंजूर झालेल्या आहेत:- 1. फलोत्पादन लागवडीसाठी अर्थसाहाय्य व प्रशिक्षण 2. रोपे वाटप 3. वॉटरशेड डेव्हलपमेंट 4. कंटुर वर औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी साहाय्य 5. सौरऊर्जेवर आधारित तारेचे कुंपन 6. ठिबक सिंचन संच बसविणे 7. तुषार सिंचन संच बसविणे 8. अनुसूचित जमातीच्या शेतक-यांच्या शेतात ट्यूबवेल बसविणे (खोदकाम, पाईप लाईन, इलेक्ट्रीक मोटार, विद्युतीकरण करणे, मजूरी इ.खर्चांसह) 9. भाजीपाला बी-बियाणे व अवजारे पुरवठा करणे 10. वाहन चालकाचे प्रशिक्षण 11. विहिरीत बोअर करणे 12. हार्डवेअर, स्वॉफ्टवेअर व डेटा ऑपरेटिंगचे प्रशिक्षण 13. किचन गार्डन आणि स्ट्रॉबेरी नर्सरी उभारणे [मित्रा संस्था/महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम )] 14. गांडूळखत निर्मिती 15. फ्लोरिकल्चर डेव्हलपमेंट 16. हॉर्टिकल्चर नर्सरी डेव्हलपमेंट 17. गांडूळखत शेत योजना (प्रशिक्षण व निर्मिती) 18. फलोत्पादनासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम 19. किरकोळ जंगल उत्पन्न/जमीनीचे सपाटीकरण 20. युवक-युवतींना ऍडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स नेटवर्किंग 21. वनहक्क संरक्षण कायद्यांतर्गत तथा स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या जमिनीवर नवीन विहीर खोदून विद्युत/तेलपंप/एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी. पाईप बसवून देणे 22. सिंचनासाठी नवीन विहिरींचे खोदकाम व बांधकाम करणे व तेलपंप योजना कार्यान्वित करणे 23. मत्स्य व्यवसाय, शेतात शेततळे तयार करणे, फळबाग लागवड करणे 24. महिला बचत गटातील अनुसूचित जमातीच्या शेतक-यांच्या शेतात हरितगृह (पॉली हाऊस) उभारणे 25. शेती अवजारे/संसाधने, खते व बी-बियाणे, वॉर्डबॉयचे प्रशिक्षण देणे, 26. सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण देणे 27. संगणक प्रशिक्षण देणे 28. ऑटोमोबाईलचे प्रशिक्षण देणे 29. कृषिमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे 30. वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे 31. हळद लागवडीसाठी अर्थसाहाय्य 32. मोगरा लागवड 33. शेडनेटची उभारणी करणे 34. कौशल्य विकसित करून स्वयंरोजगारास पात्र करणे 35. ऑफिस ऑटोमेशन कोर्सेस प्रशिक्षण 36. आचारी कौशल्य विकसित करणे 37. बिल्डिंग सुपरवायझर कोर्सेस 38. महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना व्यवसायाकरिता पोर्ल्ट्री फार्म स्थापन करून प्रशिक्षण देणे 39. मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांचेमार्फत बांबूपासून हस्तशिल्प आणि वस्तू तयार करणे 40. अगरबत्ती तयार करण्यासाठी शेड व बांधकाम करणे 41. प्लास्टीक अस्तरीकरणासह शेततळ्याचे बांधकाम करणे 42. Establishment of Bamboo Processing Unit at Gadchiroli इत्यादी

1. शासन निर्णय व शासनाने निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार अनुसूचित जमाती लाभार्थी असावा 2. टिएसपी, ओटीएसपी, माडा, मिनीमाडा या क्षेत्रात असलेली अनुसूचित जमातींच्या गावाअंतर्गत येत असलेले व अनुसूचित जमाती अंतर्गत येत असलेले लाभार्थी आरोग्य विषयक योजना - 1. ज्या गावांमध्य अनुसूचित जमातीचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. ज्या गावात अशी शिबीरे झालेली नाही तसेच कुपोषण व तत्सम दुर्धर आजार उद्भवलेले आहेत अशी गावे. रोजगार व उत्पन्न वाढीच्या योजना- 1. लाभार्थी अनुसूचित जामातीचा असवा अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 2. लाभार्थीचे कमीत कमी 10 वी पर्यत शिक्षण असावे. कृषी व फलोत्पादन योजना- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 2. पात्र व गरजू अनुसूचित जमातीचे शेतकरी व शेतमजूरांना योजनेचा लाभ देण्यात येईल. वन जमीनीचे पट्टे मिळालेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. 3. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे. पिण्याचे पाणी / विहिरीचे बांधकाम / चेक डॅम / सिंचाई योजना - 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2. त्याचे कडे किमान स्वत:ची दीड एकर जमीन असावी. लाभार्थ्याची जमीन लाभक्षेत्रात असल्याबाबत त्याचे नांवे 7/12 उतारा असणे आवश्यक. 3. लाभार्थ्याच्या स्वत:च्या जमीनीत बोअरवेल नसावी. घरकुल- 1. लाभार्थी हा अनुसूचित असावा. त्याची स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी. 2. लाभार्थ्यास पक्के घर नसावे तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अ. शासन निर्णय व शासनाने निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार व अनुसूचित जामीतीचे लाभार्थी ब. टिएसपी, ओटीएसपी, माडा, मिनीमाडा या क्षेत्रात असलेली अनुसूचित जमातीं अंतर्गत येत असलेले लाभार्थी आरोग्य विषयक योजना - 1. ज्या गावांमध्ये अनुसूचति जमातीचे मोठया प्रमाणात वास्तव्य आहे. ज्या गावात अशी शिबीरे झालेली नाही तसेच कुपोषण व तत्सम दुर्धर आजार उद्भवलेले आहेत अशी गावे. रोजगार व उत्पन्न वाढीच्या योजना- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा 2. लाभार्थीचे कमीत कमी 10 वी पर्यत शिक्षण असावे कृषी व फलोत्पादन योजना- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा 2. पात्र व गरजू अनुसूचित जमातीचे शेतकरी व शेतमजूरांना योजनेचा लाभ देण्यात येईल. वन जमीनीचे पट्टे मिळालेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. 3. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे पिण्याचे पाणी / सिंचाई योजना - 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा 2. त्याचे कडे किमान स्वत:ची दीड एकर जमीन असावी. लाभार्थ्याची जमीन लाभक्षेत्रात असल्याबाबत त्याचे नांवे 7/12 उतारा असणे आवश्यक 3. लाभार्थ्याच्या स्वत:च्या जमीनीत बोअरवेल नसावी घरकुल- 1. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. त्याची स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी 2. लाभार्थ्यास पक्के घर नसावे तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा अ. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असल्याचा आवश्यक पुरावा/ कागदपत्रे ब. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/VKS.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प